विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी 'उल्हास नवभारत साक्षरता अभियान २०२५' अंतर्गत तालुकास्तरीय मेळावा एम्स पब्लिक स्कूल, मानेगाव येथे नुकताच उत्साहात पार पडला. जिल्हा जात पडताळणी अधिकारी मा. धारगावे साहेब यांच्या हस्ते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. नंदागवळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी संदीप पानतावणे, सभापती अश्विनी मोहतुरे, गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.