उमरेड: गरडे पार पारधीबेडा येथे पोलिसांचा छापा गावठी मोहफुलाची दारू करण्यात आली नष्ट
Umred, Nagpur | Nov 30, 2025 उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गरडे पार पारधी बेडा येथे छापा मार कार्यवाही करून 15 लिटर मोहफुल दारू, 3400 किलो मोह फुल रसायन सडवा, 17 प्लास्टिक ड्रम आणि हातभट्टी चे इतर साहित्य असा एकूण एक लाख 39 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा करून नष्ट करण्यात आला. याप्रकरणी आरोपी मोरधन राजपूत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.