भोकरदन: दानापुर येथे जुई धरण परिसरात मस्य व्यवसाय करणाऱ्याची झोपडी अज्ञाताने जाळली
आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भोकरदन तालुक्यातील दानापुर येथील जुई धरण परिसरात माश्यांचा व्यवसाय करणारे तपिराम भंगरे यांची झोपडी अज्ञाताने पेटवली आहे, या वेळी उपस्थित आसलेल्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नाही,यात त्यांची झोपडी पूर्ण जाळून खाक झाली असुन त्यांचे व्यवसाय करणारे साहित्य जळले आहे, आणि यात त्यांचे हजारों रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे,