गोंदिया: कोचेवाही येथून खून करून फरार झालेला अज्ञात आरोपीचा शोध, आरोपी निष्पन्न, स्थानिक गुन्हे शाखेने केला खुनाचा उलगडा
24 ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी फिर्यादी लता बघेले यांनी रावणवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मृतक मुलगा नामे टीकेंद्रसिंह बघेले हा गावात मंडईचे कार्यक्रम बघण्याकरिता गेला असता मृतकास गावातील राम मंदिर समोर रात्री 1:30वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने मारून जीवनाशी ठार केले. फिर्यादीने दिलेली दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना आरोपीच्या शोध घेण्यात आला.