जालना: आज दि.१०/३/२६ रोजी उमेद ग्राम विकास पंचायतराज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. जालना यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त सुरु असलेल्या बचत गटांनी तयार केलेल्या विक्री प्रदर्शनास भेटी देणा-या १५४ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यांत आली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह व रक्ताच्या चाचण्या व औषधी वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.