गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षक मुंबई येथे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 राज्य शासनाच्या शालेय शिक्षा क्रीडा विभागाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा सत्कार केला. जिल्ह्यातील 3 शिक्षकांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.यामध्ये प्राथमिक विभागातून गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला येथील जी.प वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सूर्यकांता हरीणखेडे माध्यमिक विभागातील शहीद जान्या तिम्या जि.प.हाय.येथील सुभाष मारवाडे व वसंत नाईक यांच्या सत्कार करण्यात आला.