माढा: तालुक्यातील कुर्डवाडी,टेंभुर्णी,मोडनिंब येथे सकल मराठा समाजाच्यावतीने जल्लोष
Madha, Solapur | Sep 3, 2025 मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला मोठे यश प्राप्त झाले असल्याने माढा तालुक्यातील कुडूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब व माढा शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी तोफांचे सलामी देत एक मराठा लाख मराठा याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला यश आल्यानंतर माढा निर्णयामुळे तालुक्यात अनेक ठिकाण फटाके, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात आनंद देखील व्यक्त करण्यात आला आहे.