नेवासा: ऊसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये देणार
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यास या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये प्रति टन पहिली उचल देणार असून अंतिम ऊस दर हा अंतिम साखर उताऱ्यानुसार देण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले यांनी दिली.