राहुरी: बारागाव नांदुर शिवारात थेट ट्रॅक्टरवर बसून माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पहाणी
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील माहुचा मळा, मल्हारवाडी, घोरपडवाडी आदि शिवारात थेट ट्रॅक्टरवर बसून नुसकानग्रस्त भागांना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे.सततच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, घास, कपाशी, सोयाबीन अशी विविध पिके अक्षरशः उध्वस्त झाली आहेत.