अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ,पोलीस पत्नीची तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
छत्रपती संभाजीनगर: पती व सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून अंमलदाराच्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजण घटना पोलीस आयुक्तालयातील वसाहतीमध्ये घडली. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.