मारेगाव: शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली नारासाळा, सिंदी, महागाव येथील 14 महिलांची फसवणूक. महिलांची मारेगाव पोलिसात तक्रार
तालुक्यातील गोर गरीब कष्टाळू महिलांना फक्त दोन हजार रुपयांत शिलाई मशिन देतो, असे सांगून तीन भामट्यानी 14 महिलांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलांनी पोलिसांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली आहे.