हिंगणा: उखळी येथे तोंडखुरी-पायखुरी लसीकरनाला सुरुवात
Hingna, Nagpur | Oct 11, 2025 पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उखळी येथे तोंडखुरी-पायखुरी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. पशुपालकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तालुक्यातील सहा डॉक्टरांची चमू उपस्थिती होती. संपूर्ण देशाला या आजारापासून मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे. दरसहा महिन्यांनी या आजारासाठी लसीकरण केले जाते. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. अश्विनकुमार मेश्राम, डॉ. राजेंद्र निखाते, डॉ. यामिनी बावणे, वैशाली कडू, सूरज गोखले, वर्षा चाकुनदे, उत्पल डांगोरे आदीनी सहकार्य केले.