उमरखेड: चातारी येथे मुलाकडून आई-वडिलांस दगडाने मारहाण, आरोपी विरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी बाबुराव मारोती भिसे यांच्या तक्रारीनुसार 12 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा आरोपी जीवन भिसे हा फिर्यादीच्या पुतणीस शिवीगाळ करत असल्याने फिर्यादीच्या पत्नीने आरोपी मुलास हटकले असता आरोपीने फिर्यादी सोबत वाद करून फिर्यादी तसेच फिर्यादीच्या पत्नीस दगडाने मारहाण करून जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 12 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उमरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.