शहादा: सारंगखेडा येथे शनिवारी दुपारच्या सुमारास पाऊस, व्यवसायिकांची उडाली धावपळ
शहादा तालुक्यातील सारंगखेडा सह परिसरात दि.20 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसामुळे बाजार पेठेतील व्यवसायिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. तसेच रब्बी हंगामातील गहू व हरभरा काढणीवर आलेल्या पिकांचेही या पावसामुळे काहीसे नुकसान होणार असल्याची चिंता शेतकर्यांमध्ये होवू लागली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा 41 ते 42 अंशावर गेल्याने चांगलाच उकाळा जाणवत होता. यामुळे आज दुपारी पाऊस झाला.