आसगाव ते शिवनाळा रोडदरम्यान १४ डिसेंबर रोजी रात्री १०:३० ते १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. राकेश माणिक फुंडे (वय २९) रा. खैरी (घर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सासरे आनंदराव रतिराम कोरे (वय ६३, रा. आसगाव, ता. पवनी) हे आसगाव ते शिवनाळा रोडने पायी घरी परत येत असताना, अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत आनंदराव कोरे यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला