सिंदखेड राजा: सोयंदेव येथे वीज पडून गाय ठार
सिंदखेड राजा तालुक्यातील सोयंदेव येथे १५ सप्टेंबरला वीज पडून गाय ठार झाली.सोयंदेव परिसरातही पावसाने थैमान घातले असुन नदी नाल्यांना पूर आला व रावसाहेब खरात यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली. यात गायीचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी रावसाहेब खरात यांनी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता केली आहे.