शहापूर: आसनगाव येथे प्लास्टिक वस्तू बनवण्याच्या कंपनीत आग,आगीने धारण केले रौद्ररूप, 17 गाड्या घटनास्थळी दाखल
Shahapur, Thane | Oct 13, 2025 शहापूरच्या आसनगाव येथे प्लास्टिकच्या वस्तू बनवण्याच्या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पडले त्यामुळे मोठी जीवित हानी ठरली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. नियंत्रण मिळवण्यासाठी शहापूर, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीतील अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 17 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.