मोहाडी तालुक्यातील जांब येथे भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. 26 डिसेंबर रोज शुक्रवारला सायं.7.30 वाजताच्या सुमारास घडली. सुनील लेदे वय 47 वर्षे, रा.खैरलांजी,ता. मोहाडी असे मृतक मोटरसायकल चालकाचे नाव असून तो आपल्या मोटरसायकलने जांबकडून खैरलांजीकडे जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र. MH 36 AA 3013 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला धडक दिली.यावेळी जखमीला उपचारार्थ भंडारा येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला