देवरी तालुक्यातील संपूर्ण भागात आज सकाळपासून सुरू असलेल्या सतत धार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे खरीप पिके अवकाळी पावसाच्या तळाखाने पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे संपूर्ण नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजारांची मदतेसह कर्जमुक्ती तात्काळ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे भात पीक या खरीप पिकाने शेतकऱ्यांना एकदा भरघोस उत्पादनाची आशा दाखवली होती बियाणे खते कीटनाशके व मजुरीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते मा