पनवेल: लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रेलर चालकाला कोनगाव येथे लुटले, पनवेल पोलिसांत गुन्हा दाखल.
Panvel, Raigad | Apr 7, 2024 पॅन्टच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद इद्रीस हा कळंबोली येथे राहत असून टाटा टेलर क्रमांक एम एच 46 ए आर 7673 चालवतो. तो ट्रेलर मध्ये लोखंडी साळईचा माल भरून घणसोली येथे निघाला. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने कोन ब्रिजच्या अलीकडे आला असता ट्रेलर उभा केला आणि लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेला. यावेळी अंधारात दबा धरून बसलेले दोन इसमांनी त्याला धाक दाखवून लुटले.