नेवासा: एलसीबी पथकाचा घोडेगावात छापा ; साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त #नेवासा #क्राईम #घोडेगाव
घोडेगाव येथून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुटका करण्यात आली. घोडेगाव येथे काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बऱ्हाटे वस्ती येथे डांबून ठेवलेले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळाल्याने छापा टाकून पिकअप मध्ये व आजूबाजूला काही जनावरे डांबून ठेवलेले मिळून आले.