जामवाडी येथे मराठा समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी गेल्या काही काळापासून करण्यात येत होती. अखेर रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जामवाडी शिवारातील गट क्रमांक 29 मध्ये या स्मशानभूमीचे भूमिपूजन संपन्न झाले. सदर ठिकाणी काही लोकांनी पूर्वी अतिक्रमण केले होते. सामाजिक कार्यकर्ते व किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष नारायण एकनाथ वाढेकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी सरपंच काकासाहेब वाढेकर, माजी सरपंच प्रतापराव वाढेकर, पोलिस पाटील बद्री वाढेकर आदी उपस्थित होते.