नंदुरबार: जीटीपी कॉलेज जवळ आदिवासी वसाहतीत शौचालय बांधकामासाठी मुख्याधिकाऱ्यांना भारतीय स्वाभिमान संघाचे निवेदन
नंदुरबार शहरातील नगरपालिका हद्दीतील जीटीपी कॉलेज जवळील आदिवासी वसाहतीत महिला व पुरुषांसाठी शौचालय नसल्याने आज नंदुरबार नगरपालिका मुख्याधिकारी यांना भारतीय स्वाभिमान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत शौचालय बांधकाम करून देण्यासंदर्भात मागणी केली आहे.