नंदुरबार: २५ मे पासून ते ८ जून पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी डॉ मिताली सेठी
नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये याकरिता जिल्हा दंडाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या आदेशान्वये २५ मे च्या रात्री बारा पासून ते ८ जूनच्या रात्री बारा पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त प्रसिद्ध पत्रकात आज देण्यात आली आहे.