पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अंबड तालुका | 1 फेब्रुवारी 2026 अंबड तालुक्यातील पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पानेगावसह दहीपुरी, दुधपुरी व मानेपुरी या गावांच्या हद्दीत बिबट्या फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाची टीम आज (1 फेब्रुवारी) घटनास्थळी दाखल झाली. वन विभागाने तातडीने पथक नियुक्त करून बिबट्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असून नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययो