जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गौवंशीय जनावरांचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 60 किलो मांसासह एकाला ताब्यात घेतले. शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई छाईपुरा परिसरातील राणा मॉडेलिंग समोर व हमजा किराणा दुकानाजवळ करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक प्रमुख सचिन वासुदेव सानप यांना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध गौमांस विक्री होत होते.