शासनाच्या हमीभाव धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे मात्र अद्याप पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात असून धानाचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहेत तालुक्यातील 90% नागरिक शेती करून आपले कुटुंब चालवितो मात्र कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेती करणे कठीण होत चालले आहे अशा परिस्थितीत शेतकरी धानाचे उत्पादन घेत आहे मागील निसर्गाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी खरिपाचे धान घेतले त्याची शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केली