मालकनपूर येथे जय सेवा आदिवासी मंडळाच्या वतीने आयोजित आदिवासी गोंडी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी आदिवासी बांधव-बहिणींनी पारंपरिक गोंडी नृत्य सादर केले. रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा, ढोल-मंजिराच्या तालावर थिरकणारे पाय आणि गोंडी संस्कृतीची जिवंत झलक पाहून मन प्रसन्न झाले. या स्पर्धेतून आदिवासी युवक-युवतींनी आपली कला, उत्साह आणि एकजूट दाखवून दिली. ही परंपरा जपणे आणि पुढे नेणे हे खरेच अभिमानास्पद आहे.