राधानगरी: कसबा वाळवे येथून कॅनॉलवरील २ लाख रुपयांचे सहा विद्युत पंप गेले चोरीस, शेतकऱ्यांची राधानगरी पोलिसांत तक्रार
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कॅनॉल वरील शेतकऱ्यांनी बसवलेल्या सहा विद्युत मोटार पंप किंमत साधारणता दोन लाख रुपये किंमतीचे रात्री चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी शेतकऱ्यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.