संगमनेर: जोर्वे गटात थोरातांना पुन्हा दे धक्का..! पिंपरनेच्या सरपंच सदस्य ,दूध संस्थेच्या चेअरमनसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
जोर्वे गटात थोरातांना पुन्हा दे धक्का..! पिंपरनेच्या सरपंच सदस्य ,दूध संस्थेच्या चेअरमनसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश संगमनेर (प्रतिनिधी) - संगमनेर तालुक्यातील जोर्वे गट हा तसा माजी आमदार थोरात यांचा बालेकिल्ला समजला जात होता याआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोरात यांचेच वर्चस्व या गटात टिकून राहिले आहे. परंतु जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे .तशी थोरात गटाला मोठी गळती लागल्याचे चित्र आहे.