अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीकनुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन ही मागणीचे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले