भोकरदन: वाढोणा कालींका देवी मंदिर परिसरात असलेल्या डोंगरांमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
आज दि.9 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 10वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथून जवळच असलेल्या कालिका मंदिर परिसरात असलेल्या डोंगर पर्वतरांगेमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली,गणेश वाघ वय 28 वर्षे व जयाबाई पांडुरंग गवळी वय 40 वर्षे दोन्ही रा. वालसावंगी ता.भोकरदन असे आहे,याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहवर जवळच्या रुग्णालयात शविच्छेदन करून घटनेची नोंद केली.