मोर्शी पोलिसांनी केलेल्या धडक कार्यवाहीत मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करून त्याचे ताब्यातून एकूण 26 दुचाकी जप्त केल्याची माहिती आज दिनांक 8 डिसेंबरला दोन वाजता चे दरम्यान प्राप्त झाली आहे. मोर्शी शहरात भाड्याने रूम करून राहणाऱ्या लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे व खेड येथील गौरव सुरेश जामोदकर यांना अटक करून, घटनेचा पुढील तपास मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांचे मार्गदर्शनात मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे