संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेला नवा मुख्याधिकारी! दयानंद गोरे यांनी आज सकाळी 11 वाजता घेतला पदभार
संगमनेर नगरपरिषदेला नवा मुख्याधिकारी! दयानंद गोरे यांनी आज सकाळी 11 वाजता घेतला पदभार बातमी: संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेला अखेर नवे मुख्याधिकारी मिळाले आहेत. दयानंद गोरे यांनी आज (शनिवार) सकाळी 11 वाजता नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यपदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बदली झाल्यानंतर अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी धनश्री पवार या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. आज दयानंद गोरे यांनी औपचारिकरीत्या पदभार स्वीकारताच नगरपरिषदेच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी