सालेकसा: भाजेपार येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धानाची माजी आमदार सहेसराम कोरोटे यांनी शेतामध्ये जाऊन केली पाहणी
आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे माजी आमदार सहेसराम भाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र व आदिवासी महाराष्ट्र प्रदेश शिवसेना अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धानाची पाहणी केली. यावेळी उपस्थित चंद्रकुमार बहेकार सरपंच ग्रामपंचायत भजेपार विनोदजी वाढई धनराजजी बहेकर जैरामजी चुटे तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी भजेपार गावातील परिसरातील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते