लातूर : लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात राधिका पाटील यांनी गांधी चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कथित दडपशाही, गुंडागर्दी आणि हफ्तेबाजीच्या विरोधात सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाकडे नागरिकांचेही लक्ष लागले होते.