वाडी शहराच्या राजकीय इतिहासात आजवर कधीही न घडलेली एक अभूतपूर्व घटना पाहायला मिळाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हर्षल अनिल काकडे आणि पूर्वा हर्षल काकडे या दाम्पत्याने आपापल्या प्रभागातून दणदणीत विजय मिळवून 'नगरसेवक' म्हणून नगरपरिषदेत पाऊल ठेवले आहे. वाडीच्या इतिहासात पती-पत्नी एकाच वेळी निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून, या विजयाची नोंद सुवर्णाक्षरांनी केली जात आहे.