अमरावती महानगरपालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाई रामपुरी कॅम्प परिसरातून १२०० किलो प्लास्टिक जप्त; ₹५,००० दंड वसूल अमरावती महानगरपालिका यांच्या वतीने शहर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. आयुक्त सोम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) व उत्तर झोन क्रमांक ०१ चे सहायक आयुक्त यांच्या आदेशानुसार उत्तर झोन क्रमांक ०१ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरात विशेष प्लास्टिक जप्ती व दंडात्मक मोहीम राबविण्यात आली.