लाखनी: नानोरी-दिघोरीतील तरुणाचा विषप्राशनाने अंत; गावात शोककळा
आयुष्याच्या उमलत्या वयात एका तरुणाने घेतलेले टोकाचे पाऊल संपूर्ण परिसराला हळहळवून गेले आहे. नानोरी-दिघोरी येथील सारंग मुरलीधर चचाने (वय २५) या तरुणाने अनोळखी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ३० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून, विष प्राशन केल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.