वाशिम: तामसी ते वाकद रस्त्यावर खड्ड्यामध्ये फसलेले शेतमालाचे वाहन ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढले बाहेर
Washim, Washim | Sep 15, 2025 शिरपूर मार्गे तामसी ते वाकद जाणार्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, आज दि. 15 सप्टेंबर रोजी या रस्त्यावर पडलेल्या खड्यामध्ये मालवाहू पिकअप वाहन अडकल्याची घटना घडली. सदर वाहनामध्ये शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीकडे विक्रीसाठी नेत होते. ही गाडी इतकी खोलवर फसली होती की सदर वाहन बाहेर काढण्यासाठी चक्क दोन टॅ्रक्टर ची मदत घ्यावी लागली. या रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करुनही सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.