गोंदिया: जयस्तंभ चौकात जनावरांची लढाई; नागरिकांच्या जीवाला धोका!
शहराच्या मध्यवर्ती जयस्तंभ चौकात आज दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारास वाहतुकीचा मोठा ताण असतानाही दोन जनावरे रस्त्यावरच भिडली. या लढाईमुळे काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. मोटारसायकलस्वार, सायकलस्वार आणि पादचारी यांना संतुलन राखणे अवघड झाले. साक्षीदारांच्या मते, लढणारी जनावरे रस्त्याच्या मधोमध धावत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र नागरिकांम