चंद्रपूर: अवैद्य गोवंश वाहतूक प्रकरणी तीन आरोपींना अटक, तेरा गोवस्यांची केली सुटका, घुघुस पोलिसांची कारवाई
दिनांक 14/10/25 रोजी सकाळी 8:30 वा घुग्गुस पोलिसांनागुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, पिपरी धानोरा मार्गे गडचांदुर येथे एका पिकअप गाडीमध्ये गोवश वाहतुक होत आहे अशा खबरेवरून पोस्टॉफ व पंचासह धानोरा पुलिया येथे नाकाबंदी करून सदरचे पिकअप वाहन थांबविण्यात आले असता पिकअप वाहन क्र mh 49 at 0360 मध्ये 13 गायी आखूड दोरखंडाने करकचून वाहनाची क्षमता नसताना सुद्धा कत्तली करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना मिळून आले आरोपीकडून एकूण 5,60,000 रु चा माल जप्त करण्यात आला.