नेवासात बैल पोळयाच्या निमित्ताने शेकडो बैलजोडयांचा मिरवणूकीत सहभाग
#नेवासा
नेवासा येथे बैल पोळयाच्या निमित्ताने जुन्या पिढीपासून आलेल्या परंपरेचे जतन करत आपल्या लाडक्या सर्जा राजाची मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या बैल पोळा मिरवणुकीत वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडयांची सजावट करत मिरवणूकीत सहभाग नोंदवला. शेकडो बैलजोड्या निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.