गोंदिया: "लग्नापूर्वी वधू-वरांनी जन्मपत्रिका जुळवण्यापेक्षा सिकलसेलची 'रक्तपत्रिका' (Blood Report) जुळवणे भविष्यातील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे," असा मोलाचा संदेश गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिला आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या 'सिकलसेल जनजागृती सप्ताहा' निमित्त त्यांनी नागरीकांना अवाहन केले आहे