जालना: भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन
Jalna, Jalna | Sep 18, 2025 भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने गुरुवार, दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती मोती तलावात बसविण्याच्या मागणीसह बोधगया येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदनही देण्यात आले. महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावे.