एटीएममधून पैसे (Pune Crime) काढणाऱ्या कामगारांना (Pune News) पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अखेर बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव श्रीराम विकास हानवते (वय 33, रा.यमुनानगर, निगडी) असे आहे. या प्रकरणी किसनकुमार पोरराराम ध्रुव (वय 27, रा. पाषाण) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.