मध्यप्रदेशातील देवदर्शनाची यात्रा करून शहरात परतलेल्या महिलांना पंचवटी चौकात भीषण अपघाताचा सामना करावा लागला.उघडी राहिलेली ट्रॅव्हल्स बसची डिक्की रिक्षाला घासल्याने झालेल्या या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे सुमारे 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान कर्णपुरा रोडवर घडला. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा.