वैजापूर: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महाराणा प्रताप चौक दरम्यान महिलेचे साडेपाच तोळ्यांचे दागिने केले लंपास
महिलेच्या पर्समधील साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना 13 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकते महाराणा प्रताप चौक रोडवर दरम्यान घडली ही बाब हॉटेल सावता जवळ फिर्यादी आल्यावर उघडकीस आली. या प्रकरणात माधुरी मनोज देसाई वय 52 वर्षे राहणार मयूर पार्क छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.