वैजापूर: स्टेशन रोडवारी बनकर वस्ती येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
झाडाची फांदी तोडत असताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना स्टेशन रोडवरील बनकर वस्ती येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.शरद हरिभाऊ बनकर वय ३५ वर्षे राहणार बनकर वस्ती वैजापूर असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शरद बनकर हे शनिवारी सकाळी घराजवळील झाडाची फांदी तोडत असताना त्यांना ३३ केव्ही लाईनला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला.