धारदार चाकू बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चाकू जप्त केल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत तेढवा येथे शनिवारी (दि.३) सायंकाळी ७:५० वाजता घडली.१७ वर्षीय मुलगा आपल्या जवळ कमरेत फसवून धारदार चाकू बाळगत होता. यावर पोलिस नाईक प्रवीण लांजेवार, हवालदार पांडे, पोलिस नाईक मलेवार, टेंभरे, चालक शिपाई मरस्कोल्हे यांनी ४५.०५ सेमी लांबीचा, धारदार पात्याची लांबी ३३ सेमी, पात्याची रुंदी ६ सेमी एवढा चाकू जप्त केला. आपल्या संरक्षणासाठी चाकू